सर्वसामान्य घटकासाठी प्रहारचा लढा चालूच


शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन व सामाजिक कार्य नेटाने कायम चालू आहे. तालुक्यामधील शेतकरी ,दिव्यांग कष्टकरी, शेतमजूरांच्या प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकतीने लढा देत असून या घटकांना न्याय मिळेपर्यंत प्रहारचा नेटाचा लढा चालूच राहील अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी दिली.

शेवगाव तालुक्यात भातकुडगाव व दहिगावने जिल्हा परिषद गटांमध्ये प्रहारशाखा उद्घाटन कार्यक्रम पक्षाच्या वतीने आयोजित केला होता. त्याप्रसंगी  अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना अनिल चौधरी बोलत होते.

सुरवातीला सकाळी दहिगावने गटातील रांजणी, मठाचीवाडी, मजलेशहर त्याचप्रमाणे भातकुडगाव गटातील बक्तरपुर व भातकुडगाव या ठिकाणी प्रहार शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी , कल्याण महाराज काळे, डॉ. दादासाहेब काकडे, लक्ष्मी देशमुख ,पप्पू येवले, मालोजी शिकारे, प्रकाश बेरड , शेवगाव तालुकाध्यक्ष  संदीपराव बामदळे ,शेवगाव पाथर्डी विधानसभा अध्यक्ष रामजी शिदोरे, दहिगावने जिल्हा परिषद गट प्रमुख राजेश लोढे, त्याचप्रमाणे भातकुडगाव  शाखाध्यक्ष चंद्रकांत फटांगरे ,लक्ष्मण लव्हाळे ,तुकाराम लव्हाळे ,बाळासाहेब लव्हाळे, अभिषेक उगले, विठठल  वाघमोडे, बाळासाहेब नजन, रांजणी शाखाध्यक्ष संदीप चव्हाण, योगेश गवळी, ज्ञानेश्वर चव्हाण, सोमनाथ कर्डिले, तुषार शिदोरे ,संदिप आवटी,  बक्तरपूर शाखाध्यक्ष हरिचंद्र जाधव त्याचप्रमाणे प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे स्वागत भातकुडगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत फटांगरे व लक्ष्मण लव्हाळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना  संदीपराव बामदळे यांनी केली तर कार्यक्रमाचे आभार रामजी शिदोरे यांनी मानले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या