सोमेश्वरनगर वार्ताहर
बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड करून सर्व मार्गावर ऊसाची वाहतूक सुरू आहे.
परंतु सोमेश्वरनगर मधील करंजे गावातील असणाऱ्या मोठ्या खड्ड्याच्या प्रश्न मोठा ऐरणीवर आहे ,
बुधवार दि ७ रोजी दुपारच्या सुमारास ऊस वाहतूक करणारी बैलगाडी या मोठ्या खड्ड्यात आपटली असून बैल ऊसाच्या ढिगाऱ्याखाली चेंगरला असता त्याच्या डोळ्यातून पाणीच आले हे पाहून ऊस तोड मजूर गयावया करत एका ट्रॅक्टरच्या साह्याने ती ऊसाने भरलेली बैलगाडी बाजूला घेत बैलाला सुखरूप बाहेर काढले
करंजेपूल ते मोरगाव रस्त्यावरील असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे बैल ऊस वाहतूक व ट्रॅक्टर वाहतूक यांची मात्र दमछाक होताना दिसते बऱ्याच वेळा या पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे मोठे अपघातही झाले आहेत याकडे बांधकाम विभाग अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असताना दिसत आहे वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा या रस्त्याची दखल घेत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या