सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवामुंबई : अभिनेता सलमान खानआणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट ‘अंतिम’ रिलीज होण्याच्या एक दिवस आधी रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करता आली नाही. आता सलमानचा ‘अंतिम’ प्रदर्शित झाला आहे. सलमान आणि आयुषच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे आणि या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी चांगला गल्लाही जमवला आहे.

‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये सलमान खानला कदाचित जास्त फुटेज दिले गेले असेल, पण या चित्रपटात सलमान सेकंड लीडची भूमिका साकारत आहे. बरं, चित्रपटात सलमानचं केवळ असणं पुरेसं आहे. त्यामुळे हा चित्रपट सलमान खानच्या चित्रपटाप्रमाणेच सादर केला जात आहे. नुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे, जी ‘सत्यमेव जयते 2’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. या दोन चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या कलेक्शनमध्ये कोणाचा हात वरचा असेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या