महाविकास आघाडीच्या आकार्यक्षमतेचा निषेध


पुणे 

केंद्राने पेट्रोल -डिझेलवरील कर कमी केले तरी राज्य सरकारने कर कमी केला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या आकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मंडई येथे आंदोलन करण्यात आले.

केंद्राने कर कमी केला असला तरी राज्यसरकारने अजून कसलाही कर कमी केला नसून यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईला सामोरे जाऊ लागत आहे.

येणाऱ्या काळात जर महाविकास आघाडीने जर कर कमी केला नाही सर्व राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.

उत्तरप्रदेश सारखे राज्य 22 रुपये कमी करीत असून ही बाब करण्यास महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षपुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक ,नगरसेवक दत्तात्रय खाडे, पुणे शहर महिला अध्यक्ष अर्चना पाटील ,धनंजय जाधव ,नगरसेवक अश्विनी कोंढरे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या