Breaking News

कोकणातील घर घेतले म्हणून सनातनचे दाऊदसोबत संबंध ?

नवाब मलिक आज 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार
मुंबई

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी सबंध असल्याचा सनसनाटी आरोप केल्यानंतर प्रत्युतरादाखल आपण  फडणवीस यांच्या बाबतीत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा पलटवार केला आहे. माझ्या ६२ वर्षाच्या जीवनात आणि २६ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत यासारखे आरोप कुणी लावले नाही. दीड लाख फूट जमीन कवडीमोल किमतीने घेतली असा आरोप करण्यात आला परंतु देवेंद्र फडणवीस तुम्हाला ज्याने माहिती दिली तो कच्चा खेळाडू आहे असा पलटवार मलिक यांनी केला.

मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून कुठलीही संपत्ती घेतली नाही किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही असे सांगतानाच  माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचा  असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर हे सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का? असा सवाल मलिक यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केलाय परंतु उद्या अंडरवर्ल्डचा 'हायड्रोजन बॉम्ब' मुंबईत फोडून अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मुंबई शहराला 'ओलीस' (हॉस्टेजेस) कसे ठेवले. एक व्यक्ती विदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होता. तो अधिकारी कुणाचा खास होता याचा भांडाफोड आज (१० नोव्हेंबरला) करणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी जाहीर केले.

आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर दाऊद आणि बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता त्या आरोपाला नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन  उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर फटाके फोडण्याची घोषणा केली होती परंतु त्यांचे फटाके भिजल्याने फटाक्यांचा आवाज झाला नाही फक्त वातावरण करण्यात आले असा टोला मलिक यांनी लगावला.

१९९९ मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आमदार बनून या शहरात आले. माझ्या ६२ वर्षाच्या जीवनात आणि २६ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत यासारखे आरोप कुणी लावले नाही. दीड लाख फूट जमीन कवडीमोल किमतीने घेतली असा आरोप करण्यात आला परंतु देवेंद्र फडणवीस तुम्हाला ज्याने माहिती दिली तो कच्चा खेळाडू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

त्या दीड लाख फूट जमीनीवर एक मदीना तुल अमान नावाची कॉ. सोसायटी आहे. जेव्हा १९८४ मध्ये इमारत बनवली गेली. तीच इमारत गोवावाला कंपाऊंडच्या नावाने ओळखली जाते. ज्यामध्ये मुनिरा पटेलने रस्सीवाला याला विकासक करण्याचा अधिकार देऊन १४०-१५० इमारती बनवून सर्वसामान्य लोकांना विकल्या. जिथे आजपण ते प्लॅट तयार आहेत. त्याच्यापाठीमागे जी जमीन आहे. त्यावर मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आहे. त्याठिकाणी आमचे गोडाऊन आहे. ज्याची जागा सॉलीडस इन्व्हेस्टमेंट कंपनीला लीजवर देण्यात आली होती. अशी  माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

या सर्व सत्याला देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ६२ वर्षाच्या जीवनात या शहरात अंडरवर्ल्डशी संबंध आहे असा आरोप कधी झाला नाही. तुम्ही बोलताय एजन्सीसमोर जाणार... नक्की जा मी तयार आहे असे खुले आव्हानही नवाब मलिक यांनी यावेळी दिले.

खोटयाचं अवडंबर माजवून कुणाची प्रतिमा मलिन होईल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गलतफहमीमध्ये आहात. जे काही आहे त्याची सर्व कागदपत्रे रजिस्टार कार्यालयात आहेत. कंपनीची सर्व कागदपत्रे आहेत. जो आर्थिक व्यवहार झाला त्याची स्टॅम्पड्युटी भरली आहे. २० रुपये फूटात जमीन घेतली आहे असे फडणवीस बोलताय... झूठ बोलो लेकीन ढंगसे बोलो... अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.


देवेंद्र फडणवीस यांनी जो आरोप लावलाय तो संपूर्ण खोटा आहे. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते ना बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली. वॉचमनने आपलं नाव त्या जमीनीत लावलं होतं ते रितसर पैसे देऊन कमी केले गेले हे सत्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

सीबीआय असो किंवा एनआयएमार्फत चौकशी करा मी कुठल्याही चौकशीला तयार आहे. जो मी बोलतो तेच बोलणार आहे त्यामुळे ज्यांना वाटत असेल नवाब मलिक घाबरेल तर नवाब मलिक कधीच कुणाला घाबरत नाही. हसीना पारकर कोण आहे माहित नाही. सलीम पटेल याच्याकडे मुखत्यारपत्र गोवावाला परिवाराने दिले होते त्यानुसार व्यवहार झाला. त्यामुळे ही सगळी कहानी रचण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु उद्या जे काही सांगणार आहे त्याची वाट देवेंद्र फडणवीस यांनी बघावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.


Post a Comment

0 Comments