आमच्या घरातल्या मुलीचं लग्न!, संजय राऊतांसोबत डान्सच्या व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर



मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा विवाह सोहळा सोमवारी मुंबईत पार पडला. या लग्न समारंभापूर्वी हळद, मेहंदी आणि संगिताचाही जंगी कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी एका बॉलिवूडमधील गाण्यावर जोरदार डान्सही केला. मात्र राऊत आणि सुळे यांचा डान्सचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अशावेळी विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सुळे आणि राऊत यांच्यावर या डान्सवरुन जोरदार टीकाही करण्यात येतेय. या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. बाहेरचं कुणीच नव्हतं. अगदी आम्ही 50 लोकही एकत्र नव्हतं. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. आम्ही सदानंद, मिसेस राऊत, मुलं असे सगळे त्या कार्यक्रमात होते. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या