सरकारी कार्यालयातच वीजचोरी


श्रीगोंदा प्रतिनिधी :

शहरातील सरकारी कार्यालयात मीटरमध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत सरकारी बाबूची मात्र हाताची घडी तोंडावर बोट असे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे.

श्रीगोंदा शहरात तहसील कार्यालयाच्या काही अंतरावर वडळी रोडवर श्रीगोंदा मंडलाधिकारी तसेच श्रीगोंदा तलाठी कार्यालय आहे. या कार्यालयासाठी वीज वितरण कंपनी कडून वीजमिटर बसविण्यात आले आहे.

 मात्र वीजपुरवठा होताना मिटरमधून होत नाही चक्क खुलेआम मीटरमधून दोन वायरी काढून एकमेकांना पिळा मारून वीजपुरवठा चालू आहे. याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी श्रीगोंदा शहराचे तलाठी कृष्णा गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत मला काही माहीत नाही. हे सगळे असेच पहिल्यापासून चालू आहे. तसेच मीटर मध्ये कोणी फेरफार केला हे माहीत नाही असेही त्यांनी सांगितले.

 मात्र आता सरकारी कार्यालयात वीजचोरी होत असल्याने यांच्यावर महावितरण नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. मात्र सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत सरकारी बाबूची मात्र हाताची घडी तोंडावर बोट असे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या