राजमुद्रेने उजाळला रोहिडेश्वर


भोर 

तालुक्‍यातील बाजारवाडी परिसरातील रोहिडेश्वर किल्ल्यावर बाजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला आकाश दिवा लावला आहे. रोहिडेश्वर किल्ला परिसर आकाश दिव्यांनी उजाळून निघाला असून गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ तालुक्यातील रायरेश्वरावर घेतल्याने तालुक्यास ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी परिसरात निर्माण केलेल्या गड किल्ल्यांचे कायम स्मरण रहावे. गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. यासाठी राजमुद्रा असलेला आकाश दिवा लावल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक भीमराव शिंदे यांनी सांगितले. या निमित्याने किल्ल्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्ययन अनुभूतीचा अनुभव मिळाल्याने आनंद व्यक्त केला. भीमराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित चोरगे, विशाल चव्हाण, सुमित ओंबळे, दिगंबर मानकर, साहिल हवालदार, प्रतीक ओंबळे, विनायक हवालदार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या