बैलगाडीच्या चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू


कासार पिंपळगाव

बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे ही घटना घडली असून मृत्यू झालेल्या मुलाचे योगेश सोमनाथ नरोटे असे नाव आहे. 

बुधवारी (१० नोव्हेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता. मेळवस्ती ह्या त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतून खाली पडला. त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचे चाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तत्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

योगेशचे वडिल शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून एक मोठी बहिण आहे. तो आदर्श विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. घरातील आई-वडिलांबरोबर शेतीचे व घरातील छोटे मोठे काम योगेश करत होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या