कर्जत
मागील आठ दिवसापासून राज्य परिवहन मंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा यासह त्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपास कर्जत आरपीआयने पाठींबा दर्शविला आहे. राज्य सरकारने या कर्मचाऱ्याचा सकारात्मक विचार करून त्यांना योग्य न्याय द्यावा या आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे तसेच आपल्या विविध मागण्यासाठी मागील आठ दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यानी संप पुकारला आहे. श्रीगोंदा आणि जामखेड आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपास कर्जत आरपीआयच्यावतीने बुधवारी त्यांना पाठींबा देत असल्याचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे आणि वाहतूक नियंत्रक कर्जत यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रा शशिकांत पाटील, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, युवकचे विशाल काकडे, सागर कांबळे, सोहन कदम, लखन भैलुमे, नितीन भैलुमे, आकाश साळवे, अमजद शेख आदी उपस्थित होते. या काळात ३५ एसटीच्या कर्मचाऱ्याना आपला दुर्दैवी जीव गमवावा लागला आहे. त्यांचे संसार आणि कुटुंबाची अवस्था पाहता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्याबाबतीत सकारात्मक विचार करून कायमस्वरूपी समाधानकारक तोडगा काढावा अशी मागणी कर्जत आरपीआयच्यावतीने करण्यात आली.
एसटी संप काळात सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी देखील कर्जतसाठी नियुक्त असलेले निरीक्षक गोरक्ष कोरडे यांनी प्रवाशांसाठी खाजगी वाहनांची व्यवस्था करीत चालकांना रीतसर दरात नियोजित ठिकाणी रवाना करण्यात प्रमुख भूमिका निभावली.
0 टिप्पण्या