परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : कोंडे


भोर 

तालुका भाजपच्या वतीने भोर एसटी आगार परिसरात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या राज्यव्यापी बंद आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस राज्य परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भोर तालुका भाजप अध्यक्ष जीवन कोंडे यांनी केली आहे.सध्या एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. सन २०१६ पासून पगार वाढ नाही.आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आज पर्यंत ३५ हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी खून केल्याचा आरोप जीवन कोंडे यांनी केला असून परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्याच्या मुलाला तुरुंगातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत गंभीर नसल्याचे कोंडे पुढे म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी भाजप कटिबद्ध असून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू असा विश्वास कोंडे यांनी राज्यव्यापी बंद आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी अशोक पांगारे, अँड.कपिल दुसंगे, संतोष लोहकरे, किरण दानवले, पंकज खुर्द, दिपाली शेटे, स्वाती गांधी, नीलेश कोंडे, किरण वाडकर, अजय जाधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या