गुरुकुल संकुलाच्या तीन मल्लांची महाराष्ट्र केसरी साठी निवड.


भाळवणी प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत भाळवणी (ता. पारनेर) येथील गुरूकुल कुस्ती संकुलाच्या तीन खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली. या चाचणी स्पर्धेत ६५ किलो वजन गटात कुमार देशमाने याने सुवर्णपदक, ७० किलो वजन गटात ओंकार खरमाळे व ५५ किलो वजन गटात आदेश रायकर यांना रौप्यपदक मिळाले. या खेळाडूंना कुस्ती कोच गणेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या