मांडवगण फराटा :
बेपत्ता झालेल्या वडगांव रासाई (ता.शिरूर) येथील तीन मुलांचा सोशल मीडियामुळे शोध लागला असून मध्यरात्री बालके पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडगांव रासाई येथील सोहम लाड,सोहम घायतडक,अजय वारकड ही तीन मुले घरातून बेपत्ता झाली होती.
मुले बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी शोध सुरू केला होता.तर सोशल मीडियावर मुले हरवली आहेत तसेच सापडल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते.घटनेचे गांभीर्य ओळखून मांडवगण फराटा पोलिस चौकी च्या अंमलदारानी ही तातडीने शोध मोहीम सुरू केली होती.
अखेर रात्री उशिरा सदर बेपत्ता मुले पांढरेवाडी (ता. बारामती) येथे असल्याची माहिती मिळाली. अखेर मध्यरात्री ही मुले पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.
या शोधमोहीमेत वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार,शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा चे पोलिस अंमलदार प्रल्हाद जगताप,विष्णू दहिफळे यांच्यासह वडगाव ग्रामस्थ,युवकांनी मोलाची भूमिका पार पाडली. मुले पालकांच्या स्वाधीन करताना अखेर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
0 टिप्पण्या