कारखान्याच्या १ लाख ११ हजार १११ व्या पोत्यांचे पुजन


लोणी धामणी प्रतिनिधी

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२१-२२ मधील उत्पादीत १ लाख ११ हजार १११ व्या पोत्याचे पुजन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे व संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, तानाजी जंबुकर, अक्षय काळे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर किपर अनिल बोंबले तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते. 

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरामधील आजअखेर १ लाख १८ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी ९.६१ टक्के साखर उता-याने १ लाख ११ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सहविज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर ८० लाख युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ४५ लाख युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याचा २०२१-२२ चा गळीत हंगाम चालू असून कारखान्याचे संस्थापक - संचालक व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपलब्ध ऊस गाळपाचे नियोजन केले असून ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस भीमाशंकर कारखान्यास देवून सहकार्य करावे असे आवाहान कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या