पद्मश्री पवारांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत..


पारनेर तालुका प्रतिनिधी  

येथील सुपुत्र व आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना नवी दिल्लीमधे यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिल्लीवरुन तालुक्यात आल्यानंतर सर्वप्रथम वाडेगव्हाण फाट्यावर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.त्यानंतर पारनेरकडे येत असताना राळेगणसिध्दीत ज्येष्ठ समाजसेवक पदाद्मभूषण अण्णा साहेब हजारे यांच्या चरणी नतमस्तक झाले. 

अण्णांचे आशिर्वाद घेतल्यानंतर. राळेगणसिध्दी परीवाराकडुनही पोपटराव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अण्णांनी पोपटराव पवार यांचे मनस्वी अभिनंदन केले.पारनेरला आल्यावर पारनेरच्या हिंद चौकात फटाक्यांच्या आताष बाजीमधे पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व पवार पत्नीचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.त्यानंतर ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, पारनेर तालुका आत्मा कमीटीचे अध्यक्ष सरपंच राहूल झावरे, निलेश लंके युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय औटी, संदीप चौधरी, डॉ. बाळासाहेब कावरे आदींनी मिरवणुकीचे नियोजन केले. 

मिरवणुकीदरम्यान अनेकांनी पवार यांचा सत्कार करत स्वागत केले. नागेश्वर मित्र मंडळानेही पवारांच्या सत्काराचे आयोजन केले होते.पारनेर पंचायत समतीचे सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी पंचायत समिति सदस्य शंकर नगरे यांनी पोपटराव पवार यांचा सत्कार केला.आनंद हाॅस्पीटलचे मालक डॉ.आर.जी.सय्यद यांनीही पोपटराव पवार, तसेच आमदार निलेश लंके यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक डॉ. मुदस्सिर सय्यद, मुजाहिद सय्यद, अकिल सय्यद आदी उपस्थित होते.

 सुपे रोडवरील आमदार निलेश लंकेंच्या संपर्क कार्यालया मधे आमदार लंके यांनी पवार दांम्पत्याचा सत्कार करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पारनेरकरांनी ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आताषबाजी करत त्यांचे भव्य केले. पारनेरकरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात पवार कुटुंबिय अक्षरश: भारावुन गेले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या