शेवगांव पांढरीपुल रस्ता बनला मृत्युचा सापळा

तरूणांची अनोखी गांधीगीरी


ढोरजळगांव  

शेवगांव पांढरीपुल रस्ता बनलाय मृत्युचा सापळा माका ते शेवगांवपर्यत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाली खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असुन ढोरजळगांव येथे रस्त्यावर उखडुन पडलेले मोठाली गोटे तरूणांनी गोळा करून आनोखी गांधीगीरी केली.

शेवगांव ते अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणचा रस्ता म्हणुन ओखळला जाणारा माहामार्ग तीन तालुक्याच्या सरहद्दीतुन जात आसताना देखिल या रस्त्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसुन वेळोवेळी मुरूम व खडी टाकुन खड्याची डागडुजी करण्याची मानसिकता सार्वजनिक बांधकाम खाते दाखवित आसुन कित्येकांना आपघाताने जीव गमवावे लागले आसताना यारस्त्याची शासन दरबारी कोणीही दखल घेत नाहीये.

शेवगांव पांढरीपुल रस्ता हा जिल्हाच्या ठिकाणी कमी वेळेत व सुयीस्कर म्हणुन ओळखला जात आसला तरी यापुर्वी संबधित ठेकेदारांनी व सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळोवेळी डागडुजी करण्याचा केविलवणा प्रयत्न केला आसला तरी नुकताच पाऊसाळा संपल्यानंतर मध्यभागी गडघ्या इतकली खड्डे पडले असुन रस्त्यावरील खडी उखडल्याने वाटसुरीची गाडी घसरून मागील गेल्या काही दिवसांत कित्यांचा आपघात झाला असुन ही उखडली खडी मोठाल्या वाहणाच्या चाकाखाली आल्यामुळे उडुन कोठे लागतील हे सांगणे मुश्किल असुन दुतफा साईडपट्टीचा भराव नसल्याने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आसुन ही वाटसरूसाठी मोठी चितेंती बाब बनली आहे.

शेवगांव पांढरीपुल रस्त्याची त्वरीत दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा ज्ञानेश्वर फसले,किरण लांडे,अजय साबळे,कैलास देशमुख ,संभाजी देशमुख ,मधुकर कराड,सोमनाथ पाटेकर आदीसह ग्रामस्थांनी दिला आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या