राजश्री घुले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


शेवगाव प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १५ नोव्हेंबर रोजी शेवगाव तालुक्यातील वडुले येथे सरपंच प्रदीप नानासाहेब काळे व वडुले बु।। ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक यासह कोरोनाकाळात नागरीकांना सुविधा देणाऱ्या कर्मचार्‍यांचा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडुले गावाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे शिंदे गुरुजी, चेअरमन गागंधर चोपडे, मुरलीधर काळे, सरपंच प्रदीप काळे आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच प्रदीप काळे म्हणाले की, लोकनेते मारुतराव घुले यांनी दिलेल्या सामाजिक कार्याचा वारसा आज घुले बंधू निस्वार्थीपणे काम करत आहे. घुले बंधू मुळेच शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून वडुले गावातील विविध विकास कामे झाली, व नवीन कामाला मंजुरी मिळाले आहे. घुले बंधू राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देतात यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. 

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले ताईंच्या सहकार्याने शाळेसाठी व गावासाठी करण्यात येत असलेल्या विविध विकास कामासंदर्भात माहिती दिली. शाळेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, वही-पेन व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप काळे, कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी, शिंदे गुरुजी, मुरलीधर काळे, अशोक काळे, सुहास गर्जे, गणेश जर्गे, पांडुरंग हरदास, कृष्णा निकाळजे, राम हरदास, भगवान पाटील, संदीप गायकवाड, शरद पवार, अंजाबापू गायकवाड, संजय पांडव, भाऊसाहेब चोपडे, बाबासाहेब बाबर, बाबासाहेब काटे,  आप्पासाहेब सागडे, चंदुलाल शेख, चेअरमन गंगाधर चोपडे, सर्व शिक्षक ग्रामसेवक संजय घुगे यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच प्रदीपभाऊ काळे यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी उत्तम प्रकारे केले तर शाळेच्या वतीने गोर्डे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या