टाकळी भीमा येथील गुंड वस्ती येथे बसवला हायमास्ट


तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी) 

टाकळी भीमा (ता.शिरूर) येथील गुंड वस्तीवर कै.वसंत घोलप यांच्या स्मरणार्थ उपसरपंच सविता घोलप यांच्या स्वखर्चाने हायमास्ट दिवा बसवल्याने परिसर प्रकाशमय झाला.

टाकळी भीमा येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दहशतीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गरज ओळखून उपसरपंच सविता घोलप यांनी स्वखर्चाने गुंड वस्ती येथे हायमास्ट दिवे बसवण्यात आले. यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी वडघुले, पोलीस पाटील प्रकाश करपे, मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटोळे, उद्योजक चेतन घोलप,दादासाहेब साकोरे, रवींद्र गुंड, सुभाष घोलप, विजय साकोरे,विशाल वडघुले,समीर एडके, प्रताप वडघुले,निवास साकोरे, शहाजी साकोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या