मानसिंग पाचुंदकर यांचे कार्य आदर्शवत : आ. नीलेश लंके


रांजणगाव गणपती/प्रतिनिधी - 

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच विविध सर्वांगीण विकासकामे मानसिंग पाचुंदकर मार्गी लावत आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य आदर्शवत आहे, असे मत पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.            

रांजणगाव गणपती, ता.शिरुर येथे मानसिंग पाचुंदकर पाटील मित्र परिवार आयोजित मानसिंगभैय्या प्रीमियर लिग २०२१ या शिरूर तालुक्यात प्रथमच आयोजित भव्य डे - नाईट क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार लंके यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सदस्या सविता बगाटे,शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार,आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, सुभाष उमाप,राजेंद्र गावडे, खरेदी विक्री संघांचे संचालक दत्तात्रय कदम, सेवानिवृत पोलिस अधिकारी बाळासाहेब पाचुंदकर, सोहनराव पाचुंदकर,शिवाजी शेळके, डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर, उद्योजक शुभम नवले आदिसह सर्व संस्थांचे पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आमदार लंके पुढे म्हणाले कि,या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंचा या स्पर्धेतील सहभाग हा अत्यंत महत्वपूर्ण आहे.तरुण पाठीशी ठाम असल्याने पाचुंदकर यांना भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगत आमदार लंके यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संयोजकाचे कोतुक केले.ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंकरिता एक  पर्वणीच असल्याचे माजी आमदार गावडे म्हणाले. यावेळी पाचुंदकर यांनी क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी अधिक मोठी भरविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. या स्पर्धेचे आयोजनउद्योजक गणेश लांडे, संपत शेळके, शुभम नवले, मोहन शेळके, सचिन दूंडे, ज्ञानेश्वर पाचुंदकर, मंदार पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर मित्र परिवार यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या