आता चाऱ्यासाठी दाही दिशा भटकंती


अजनुज प्रतिनिधी

आता चाऱ्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ आली आहे सध्या तरी हे दृश्य पाहावयास मिळत आहे. आपली मेंढरं घेऊन मेंढपाळ जिकडे चाऱ्याचा स्रोत असेल याच दिशेने भटकंती करू लागला आहे. पुर्वी मेंढरांसाठी मोठ मोठी चारा ठिकाणे असायची परंतु ही परिस्थिती पूर्ण पणे आता बदलली आहे.

अलिकडे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात तणनाशके फवारणी करू लागल्याने चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.पिणयाच्या पाण्यापासून प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.काही शेतकरी तर साधे मेंढरं सुध्दा आपल्या शेतात येवू देत नाहीत.वेळप्रसंगी दमदाटी दिली जाते तरी सुध्दा अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. सर्व काही जीवन याच मेंढरावरच चालते.आता हळूहळू दूर अंतरावर जात असताना एक एक दिवस काढीत जावे लागते पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू होतो अशी भटकंती कायम सुरुच असते.

काही भागात तर पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यावेळेस दोन तीन किलोमीटर वरून डोक्यवरती

 पाणी आणावे लागत आहे. त्यातच चोरा चिलटांच तर भितीच असते रात्र रात्र डोळ्यांनी काढावी लागते.गायरान पुर्वी सारखी राहिली नाहीत आहे तेथे मेंढरांना चरू दिल जात आहे. मुला बाळं शिक्षणापासून वंचित आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या