"होटल द ललित मे छुपे है कई राज"

नवाब मलिक करणार रविवारी नवा धमाका 


मुंबई 

क्रुझ ड्रग्ज प्रकरणाला कलाटणी देतानाच एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना अडचणीत आणणारे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज एक ट्विट केले असून,दीपावलीच्या शुभेच्छा देतानाच 'होटल द ललित मे छुपे है कई राज…. मिलते है रविवार को' असे म्हटले असल्याने येत्या रविवारी मलिक कोणता धमाका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी अनेक उलघडे करून एकच खळबळ उडवून दिली होती.या प्रकरणात असलेले पंच यांच्यावरही गंभीर आरोप करीत यावर त्यांनी अनेक खुलासे केले होते. एवढेच नाही तर भाजपचे नेते मोहित कंभोज आणि नवाब मलिक यांच्यात या प्रकरणावरून ट्विटर वॉर सुरू आहे.दररोज सकाळी पत्रकार परिषदेत पुराव्यासह आरोप करणारे मलिक यांनी आज दिवाळीच्या तोंडावर आज एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. "शुभ दीपावली…आप सभी की दिवाली मंगलमय हो….होटल द ललित मे छुपे है कई राज…. मिलते है रविवार को…" असे ट्विट मलिक यांनी केल्याने येत्या रविवारी ते कोणता नवा आरोप करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या