वारकरी साहित्य परिषदेचा १० वा वर्धापन दिन साजरा


आळंदी  

वारकरी चळवळीतील संताच्या विचारांचा वसा व वारसा जतन करुन या संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य वारकरी मंडळीनी एकत्रित येऊन व या विचाराने प्रेरित होऊन सन २०११ साली वारकरी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली, यंदा वारकरी साहित्य परिषदेचा १० वर्धापन दिन सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे संपन्न झाला. 
यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे,डॉ.शिवाजी  मोहीते,हभप संजय महाराज घुंडरे,हभप नरहरी महाराज चौधरी,जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब हांडे,हभप आसाराम महाराज बडे,पंडित महाराज क्षिरसागर, नामदेव महाराज चव्हाण,सविता गवते,सचिव रामदास कुटे, डाॅ.लता पाडेकर,संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,अभिषेक उमरगेकर,राजेश दिवटे,विजय गुळवे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले की संतांनी संकलित केलेल्या ज्ञानाचा प्रसार करणे संतांनी केलेल्या कार्याची माहिती देणे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आणि जनजागृती करणे हे वारकऱ्याचे ध्येय लक्षात ठेवून वारकरी साहित्य परिषद कार्यरत आहे.
यावेळी डॉ.शिवाजीराव मोहिते, हभप चैतन्य महाराज लोंढे,हभप संजय महाराज घुंडरेे, हभप नरहरी महाराज चौधरी यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी किर्तनकार व खाजगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांना यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या