जीप अपघातात पाच ठार

सरकारी हेकेखोरीमुळे सामान्यांचं मरण झालं स्वस्त 


सोलापूर 

अक्कलकोट-सोलापूर मार्गावर आज सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या प्रवासी जीपच्या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत असतानाच हा भीषण अपघात घडल्याने भाजपाचे नेते गोपीचंद पडाळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडली. 

थमिक माहितीनुसार जीपच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात घडलाय. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सोलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे येत होती. परंतु सोलापूरच्या अलीकडे कुंभारी येथे भरधाव वेगातील जीपचे पुढील चाकाचे टायर फुटले आणि जीप कलंडली. जीपमधील अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृत आणि जखमींमध्ये सोलापूर, पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याच अपघाताच्या पार्श्वभूमीवर पडाळकर यांनी सामान्यांचं मरण स्वस्त झालंय, असं म्हणत ट्विटवरुन टीका केलीय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या