कोंढाणा किल्याची हुबेहूब प्रतिकृती मळशीत..


सोमेश्वरनगर 

बारामती तालुक्यातील गेले पंधरा वर्ष दिवाळीनिमित्त विविध ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती बनवणारे मळशी-वाणेवाडी येथील जगताप कुटंबातील आकाश, इंद्रनील ,रुद्रवीर  व त्यांच्या सहकारी मित्र मंथन रणवरे व श्रेयस काकडे तयार   करत असतात  त्यांनी एकत्र येत याही वर्षी सिंहगड (कोंढाणा) म्हणजे  तानाजी मालुसरे यांनी काढलेले   शिवाजी महाराजांना उदगार'आधी लगीन कोंढाण्याचे ,मग रायबाचे "अशी असणारा (कोंढाणा)सिंहगड म्हणुन प्रसिद्ध असलेला किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केलेली आहे . त्यांनी  आज पर्यंत जंजिरा ,रायगड ,प्रतापगड ,शिवनेरी ,तोरणा या किल्यांसह अनेक विविध किल्ले प्रतिकृती स्वरूपात  बनवलेले आहेत, व ते दर वर्षी जिल्हा ,तालुका स्तरीय किल्ला स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय असेही क्रमांक पटकावले आहेत व त्यांनी गेल्या तीन वर्षात प्रथमच क्रमांक मिळवलेला आहे व याहीवर्षी त्यांना प्रथम क्रमांक मिळणार मिळणारच असेही त्यांनी बोलताना सांगितले 

शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक असणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी  तालुक्यातील अनेक मित्र परिवार हे खास जगताप कुटुंबीयांच्या घरी  आवर्जून पाहण्यासाठी येत असतात व हुबेहूब प्रतिकृती असल्याने त्यांना त्यांना त्यांची प्रशंसा व कलेची दादही देतात , याकामी ते आठ ते दहा दिवस किल्ल्याची प्रतिकृती व आकर्षित दिसण्यासाठी हे कुटुंब दिवस रात्र झटत असते व त्यांनाही यांचे समाधान वाटते.

कोणतेही किल्ल्याची प्रतिकृती  बनवत असताना जगताप कुटूंब प्रत्यक्षात किंवा गुगल मॅपच्या द्वारे  बनवणाऱ्या  ऐतिहासिक किल्याची शहानिशा करून ते हुबेहूब कशी होईल याची दक्षता घेतात.

- इंद्रनील जगताप


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या