शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला न्याय देण्यासाठी कटीबद्ध : ढवळे


पानेगाव 

शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य म्हाडाचे अध्यक्ष तथा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे राज्यध्यक्ष नामदार शिवाजी ढवळे (पानेगांव ता. नेवासे) महादेव देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी मार्गदर्शक सुनिल भवार हे होते.

यावेळी ना. ढवळे यांनी सांगितले की, २५ वर्षाच्या कालखंडात समाजाचा प्रश्नांनसाठी अहोरात्र काम करुन समाजाचे असंख्य प्रश्नांन बरोबरच हक्क, सन्मान मिळवून दिला. आज समाज राज्यात ताठ मनाने जगत असून राज्यात १७ जिल्ह्यात ९८ तालुक्यात ४ हजार पदाधिकारी संघटनेचे काम करत आहेत. मी नेहमीच पदाचा वापर समाजासाठी केला आसल्यानेच सर्वच बहुजन समाज आपल्या बरोबर आहे. समाजाचा नावावर दुकानदारी करून समाजाची फसवणूक करणाऱ्या पासून सावध राहून त्यांना खड्या सारखं बाजूला सारा, उघडे पाडा असा सल्ला यावेळी देवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर बसविले या बद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी संघटनेपासून दुरावले ५० युवकांनी पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले. त्यांचा सत्कार ना. ढवळे यांनी केला.

संजय पवार यांनी सांगितले की, २५ वर्षांपासून नामदार ढवळे हे समाजाची सेवा करत असून समाजाला जागृत करण्याचे काम त्यांनी केले. ढवळे साहेब हे मंत्री पदावर पोहचले असून हा आनंद प्रत्येक  भिल्ल समाजा बरोबरच सर्व समाजाला असून त्यांचे काम लोकाभिमुख असल्याचं सांगितलं त्याच बरोबर  खऱ्या अर्थाने दिशा दाखविण्याचे काम करुन न्याय मिळवून दिला. शिवसेनेचे बाळासाहेब पवार, नानासाहेब बर्डे , बाळासाहेब शिंदे,

विलास बर्डे, भाऊसाहेब वाघमारे,दक्षिण जिल्हाप्रमुख  आप्पासाहेब गोलवड, सुभाष मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिताराम बर्डे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष मोरे,विजय सुर्यवंशी,लक्ष्मण जाधव, सुरेश जाधव,तानाजी गायकवाड, सतिश वाघमारे, भाऊसाहेब वाघ, भाऊसाहेब वाघमारे, अनिल वाघमारे, रमेश शेंडगे अमोल कापसे, सुनिल विटनोर, आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक- संजय पवार यांनी केले सुत्रसंचालन - बाळासाहेब नवगिरे यांनी तर- संजय वाघमारे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या