कोल्हापूरःआनिल पाटील
आजपर्यंत अभिनेता म्हणून सूपरस्टार असणारा सलमान खान आता निर्माता म्हणून दिसणार आहे.सलमान खान फिल्मस निर्मित पहिलाच चित्रपट " अंतिम -द फायनल ट्रुथ" 26 नोव्हेंबर 2021 रोजी भारतभर प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करीत आहेत.त्यामुळे सलमान खान व महेश मांजरेकर यांचे काॅम्बिनेशन कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.याचित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सलमान खान व महेश मांजरेकर यांनी दिलखुलास संवाद साधत अंतिम-द ट्रुथ चे सत्य समोर आणले.
अंतिम -द ट्रुथ च्या निर्मितीची कल्पना कशी सुचली यावर सलमान म्हणाला, दबंगचे कॅमेरामन महेश लिमये यांनी मुळशी पॅटर्न चित्रपटाची माहिती दिली.त्यामुळे उत्सुकता वाढली.हा चित्रपट पहाताना मला राजवीर सिंगचे कॅरेक्टर सुचले आणि यावर आम्ही काम सुरू केले.आणि मुळशी पॅटर्न पेक्षा वेगळा असणारा चित्रपट तयार झाला.मुळशी पॅटर्न एका चुकून गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या युवकाची कथा आहे तर अंतिम हा चित्रपट पोलिस अधिकारी व त्याची कर्तव्यनिष्ठपणा याची कथा आहे.या चित्रपटात राहुल्याची भूमिका आयुष शर्माला देताना घरचा कलाकार होता म्हणून भूमिका दिली गेली का या सवालावर सलमान बोलला,माझा मेहुणा म्हणून आयुष या चित्रपटात नसून तो एक उमदा कलाकार आहे हे लक्षात घेऊन त्याला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी भूमिका दिली आहे.कथालेखन करताना आयुषमध्ये महेशजींना राहुल्या दिसला त्याविषयी सर्वती चर्चा झाली आणि महेशजींनी आयुषकडून सरप्राइज असेल असे काम करून घेण्याची जबाबदारी घेतल्याने त्याला ही भूमिका मिळाली.अनेक कठिण ॲक्शन दृश्यात जखमी होऊन ही आयुषने चित्रपट पुर्ण केला.तो किती मेहनती आहे हे आता पडद्यावर दिसेलचं पण सलमान खानचा मेहुणा यापेक्षा चांगला नवा कलाकार म्हणून त्याला ही भूमिका मिळाली.हा चित्रपट म्हणजे माझी निर्मिती असल्याने मी चुकीचा कलाकार निवडून कंपनीचा तोटा का करून घेईन ,या चित्रपटातील सर्वांचीच भूमिका लक्ष वेधून घेणारं असल्याचे सांगत सलमान म्हणाला,मी व आयुष फक्त एका घरचे आहोत इतर कलाकार वेगवेगळे आहेत त्यामुळे एकाच घरचा हा सिनेमा म्हणता येणार नाही.या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सलमानने सांगितले,या चित्रपटात मी राजवीर सिंगचे कॅरेक्टर करत आहे, यापुर्वीच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेपेक्षा रणवीर सिंगचे कॅरेक्टर वेगळे आहे.तो कर्तव्यनिष्ठ व कठोर आहे.सत्यावर त्याचा विश्वास आहे तर गुन्हेगारी विजयी प्रचंड राग, त्याच्या या स्वभावावर हा चित्रपट आधारित आहे.कोरोना संकटामुळे हा सिनेमा वेळेत पूर्ण न झाल्याने बजेट ही वाढत गेल्याचे निर्माता सलमान खानने सांगितले.तरीही आता प्रेक्षकांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अंतिम-द ट्रुथ द्वारे पुर्ण होतील असेही शेवटी सलमान बोलला.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट म्हणजे पुर्णतः मुळशी पॅटर्नचा रिमेक नसून जमीन हा आत्मा कायम ठेवून एक वेगळी कथा लिहिण्यात आल्याचे सांगितले.ते पुढे म्हणाले, अंतिम-द ट्रुथ हा चित्रपट गॅंगस्टरविषयी नसून एका ईनामदार , कर्तव्यनिष्ठ पोलिसाची कथा आहे.या पोलिस अधिकाऱ्यास कर्तव्य बजावताना कोणकोणत्या अडचणी येतात व तो कायद्याचे राज्य कसे आणतो याची कथा यात मांडण्यात आली आहे.याचित्रपटात सलमानच्या समोर कोण कलाकार असावा याचा विचार करताना मला आयुष शर्मा डोळ्यासमोर आला.त्याच्यात राहुल्या दिसला.हा मुलगा प्रचंड मेहनती व इतरांच्या सुचनांचे पालन करणारा कलाकार आहे.त्यामुळे राहुलच्या साकारणे सोपे झाले.कलाकार व निर्माता म्हणून जबाबदारी घेणारा सलमान सारखा व्यक्ती मिळाला तरच अंतिम-द ट्रुथ सारखा सिनेमा बनतो असे सांगून मांजरेकर म्हणाले, सलमान व आयुषसह या चित्रपटात महिमा मकवान, उपेंद्र लिमये, सचिन खेडेकर व मी स्वतः यांच्या ही भूमिका प्रभावी आहेत.ॲक्शन बरोबर या चित्रपटाला साजेशी गाणी आहेत, त्यामध्ये भाई का बर्थडे या धम्माल गीतासह कोई तो आयेगा,होने लगा व चिंगारी सारखी लावणी प्रेक्षकांना आवडेल.26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आवडेल.व वास्तवसारखे वेगळेपण जपेल असा विश्वास ही शेवटी मांजरेकर यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या