बिबट्याचा हल्ला : कालवड जखमी


चास प्रतिनिधी 

चास  नारोडी आंबेगाव तालुक्यातील चास गावातील मध्ये  बिबटयाच्या हल्ला ,आठ महिन्याची कालवड जखमी झाली आहे.

आबेगांव तालुक्यातील पश्चिम भागातील चास या गावामध्ये मध्य रात्रीच्या सुमारास सुदर्शन ईश्वर बारवे व कचर रघुनाथ बारवे यांच्या घरा शेजारी गोठ्यात  बिबटयाने हल्ला केला. यावेळी गोठया मध्ये गाय म्हैस व गायचे वासरू होते. रात्री एक वाजता बिबटयाने गोठ्यात  प्रवेश करून वासराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात वासराला बिबटयाने जखमी केले त्यावेळी  तिथे असणाऱ्या गाय व म्हैस ने ह्मंबरडा केल्या मुळे कचर बारवे व सुदर्शन बारवे  हे घराच्या बाहेर आले त्यांनी गाेठ्याकडे गेले असता बिबटयाने तेथुन पळ काढला ,यावेळी त्यानी समक्ष वासराला पकडताने पाहिले होते. त्यामुळे ते देखील भयभीत झाले. दोघांनी आरडा ओरडा केल्या  नंतर बिबटयाने मात्र पळ काढला रात्रीच्या वेळी     वनविभागाकडे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. वस्तीवर लहान मुले असल्यामुळे वस्तीवर घबराटीचे वातावरण झाले आहे. यापरिसरात अनेक दिवसांपासून बिबटयाच्या दहशतीचे वातावरण मात्र कायम आहे ,यापरिसरातील नारोडी ,लांडेवाडी ,अशा अनेक ठिकाणी बिबटयाच्या घटना वारंवार घडतांना याआधी देखील पहायला मिळाल्या आहेत  ,तेव्हा येथील नागरिकांनी  याआधी देखील  बिबटयाला जेरबंद करण्यासाठी  वनविभागाकडे   पिंजरा लावावी अशी मागणी देखील केली होती .परंतु वनविभागाने या गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष दिले नाही ,तरी भविष्यातील अशा घटना घडू नये महणून लवकरात लवकर वनविभागाने उपाय योजना करावी अशी मागणी चास गावातील   ग्रामस्थांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या