नाशिक: पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये नम्रता होती. सर्वजण एकमेकांचा आदर करायचे. अलिकडे पुढारी नमस्कारही करत नाहीत. यांच्या बापाचे काय जाते तेच कळत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लीच्या राजकीय संस्कृतीवर आसूड ओढले.
कळवण येथे कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. कोण काय काय बोलतो ही काय महाराष्ट्रची संस्कृती आहे का? कोणी बस फोडतोय… असे करू नका असं सांगतानाच पूर्वी राजकारण्यांमध्ये नम्रता होती. अलीकडे पुढारी नमस्कार सुद्धा करत नाही, काय त्यांच्या बापाचे जाते कळत नाही. कोणीही तांब्रपत्र घेऊन येत नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. आपण जमिनीवर राहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.
0 टिप्पण्या