पिळदार शरीर बनवण्यासाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या तरुणांवर गुन्हा


बारामती 

शरीर पिळदार बनवण्यासाठी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या बारामती कसबा परिसरातील युवक प्रदीप सुरेश सातव (वय.२८ वर्ष, रा.कसबा,ता.बारामती, जि.पुणे) याच्या ताब्यातील २० इंजेक्शन बॉटल ताब्यात घेत त्याच्यावर औषध निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील अंदाजे साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आजकाल तरूण पिढीमध्ये शरीर बनवण्याचे वेढ वाढलेले आहे. त्यासाठी काहीही करावयाची त्यांची तयारी आहे. त्यासाठी डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखेसुद्धा प्रकार केले जातात. परंतु त्याचे दुष्परिणाम हा शरीरावर होत असतात. चित्रपट व टेलिव्हिजनमधील हिरोसारखे दिसणारे शरीर बनवण्याचा प्रसन्न होतो, परंतु त्यामुळे शरीराची खुप मोठया प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकाचा जनमध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना सुदधा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचल्या आहेत.

आणि त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुदधा पसरत आहे. असाच एक इसम नामे प्रदिप सुरेश सातव (रा.कसबा बारामती) हा जिम करणारे लोकांना शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असलेची माहिती पोलिसांना मिळाली  सदर माहिती मिळताच त्या आधारे  सापळा रचून सदर व्यक्तीस त्याची केटा गाडी (क.एम.एच.०२ डी.झेड.७२८६) सह पकडून त्याच्या गाडीची झडती घेतली असता एकुण २० इंजेक्शन बॉटल मिळुन आले. सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केले नंतर पुरवठा नियंत्रित करण्यासाठी व दुखवटा कमी करणेसाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलेनंतर सुस्ती न येणेसाठी केला जातो. 

सदरचे औषध हे शरिरावर दुष्परिणाम करणारे असल्याचे औषध निरीक्षक यांनी सांगितले. सदरची औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसुन ते बारामतीमधील जिमला विकले जात असल्याने तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली. आहेत. त्याअन्वये बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सदर इसमाकडून किंमत अंदाजे ९ लाख रूपये असा किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. तसेच सदर औषध कोठून आणली व अजून कोणा–कोणाली विकली आहे. याचा पुढील तपास पोसई गणेश पाटील हे करीत आहेत. शरीर नैसर्गिकरित्या कमवा कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका असे आवाहन देखील बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस कर्मचारी बंडू कोठे, अजित राऊत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे, मनोज पवार यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या