आरोग्यमंत्री पत्रकार परिषद सोडून निघून गेले...


अहमदनगर

आगीच्या घटनेनंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला 9 मंत्री दोन खासदारांनी भेट दिली आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली मात्र दुर्घटनेची जबाबदारी कोणावर निश्चित नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठीशी का घातले जाते, जबाबदारी कुणाची? महापालिकेच्या पत्रावर काय कार्यवाही केली? बांधकाम खात्याने सुचवलेल्या दुरुस्त्या का केल्या गेल्या नाहीत? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेले. यावेळी ना. नीलम गोऱ्हे, आ. संग्राम जगताप उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या