हिंदू आघाडी आणि शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने सैनिकांच्या घरी जाऊन
अखंडपणे एक दिवा सैनिकांसाठी हा उपक्रम मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या
अध्यक्षतेखाली व निमगाव म्हाळुंगीचे सरपंच महेंद्र रणसिंग यांच्या
नेतृत्वाखाली संपन्न झाला.
यावेळी जवान सीमेवर
देशाचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण आपल्या कुटुंबीयांसमवेत सर्वजण दिवाळी
आनंदाने साजरी करू शकतो असे मत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद
एकबोटे यांनी व्यक्त केले.
यावेळी
ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांना पुष्पहार अर्पण करून निमगाव
म्हाळुंगीचे विद्यमान सरपंच महेंद्र रणसिंग यांच्या हस्ते सैनिकांच्या
कुटुंबीयांना मिठाई देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निमगाव
म्हाळुंगी येथील प्रत्येक सैनिकांच्या घरी जाऊन नगारा वादन करत घरासमोर
दिवे लावून व दाराला तोरण बांधून भारत मातेचा जयजयकार तसेच जय जवान जय
किसानचा जयघोष करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी
कासारी गावचे सरपंच गणपतराव काळकुटे, त्रिदल संस्थेचे सचिव माजी सैनिक
तुकाराम डफळ, निमगाव म्हाळुंगीचे उपसरपंच तनुजा विधाटे, शिवराज्य
प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे, भाजपा कामगार आघाडीचे संतोष
करपे,शिवराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवाजी काळे, हनुमंत घोलप,सामाजिक
कार्यकर्ते एकनाथ लांडगे, विजय विधाटे, सैनिक महेंद्र चव्हाण, दत्तात्रय
शिवले,राहुल चव्हाण,किशोर भिकुले,ओंकार फंड,कुणाल काळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या