बाभूळसर तंटामुक्ती अध्यक्षपदी नागवडे


मांडवगण फराटा 

बाभूळसर बुद्रुक (ता.शिरुर) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अरुण संपतराव नागवडे यांची व उपाध्यक्ष पदी शरद अर्जुनराव नागवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच गणेश मचाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड ग्रामस्थांच्या वतीने एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामसेवक गायकवाड यांनी ग्रामसभेत विविध विषयांचे प्रस्ताव वाचन केले. कारखान्याचे संचालक वाल्मिक नागवडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.या प्रस्तावाला एकमताने स्विकारत घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक रामाआण्णा नागवडे व बाळासाहेब ढमढेरे यांनी  अध्यक्ष उपाध्यक्ष साठी दोन्ही नावांसाठी दुजोरा देत बिनविरोध निवड पार पडली.यासाठी परिक्रमा शैक्षणिक संकुलचे संचालक हनुमंत पाटोळे,सरपंच गणेश मचाले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ नागवडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष नागवडे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित पाडळे यांनी केले.या वेळी रामभाऊ नागवडे,विलास नागवडे,अंकुश नागवडे, माधव नागवडे,शामराव नागवडे,रामराव पाटील नागवडे, चंद्रकांत नागवडे, सुभाष नागवडे,भरत नागवडे,रामभाऊ नागवडे,रामभाऊ नेते, सुनील नागवडे, गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना समान न्याय देत गावातील होणारे तंटे गाव पातळीवर सर्वांना सोबत घेऊन मिटवण्याचा प्रेयत्न करू.तसेच आमच्या वर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारीने पार पाडू असे अध्यक्ष अरूण नागवडे  यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या