बलात्कार प्रकरणी जामीन मंजूर


पुणे प्रतिनिधी

खाण्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणात न्यायालयाने एकाला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. एस.श्रीवास्तव (रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे अटकपूर्व झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी 31 वर्षाची आहे. तिचे दोन विवाह झाले आहेत. उच्चशिक्षित आहे. तिने आणि तिच्या नवऱ्यानेच आरोपीला मारहाण केली आहे.

आरोपीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर तिने काऊंटर म्हणून बलात्काराची फिर्याद दिली आहे. यावरून त्याला गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्याची मागणी ऍड. प्रवीण नामदेव डाळींबे, अनिरूध्द कांबळे आणि ऍड. संकल्पा वाघमारे यांनी केली. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.

त्याची आणि तिची ओळख एका स्पा सेंटरमध्ये झाली. त्यानंतर तिच्या पतीशी त्याने मैत्री केली. तिच्या सोसायटीत तो राहायला गेला. खाद्य पदार्थातून गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या कृत्याचे अश्‍लील चित्रण केले. ते पतीला दाखविण्याची भीती दाखवत 26 एप्रिल 2020 ते 14 जून 2021 या कालावधीत बलात्कार केला. तसेच, तिच्या खात्यातील पैसे त्याच्या खात्यावर पाठवून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या महिलेच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी फिर्याद दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या