पुरावे सादर करण्यास परमबिर सिंग यांचा नकार


मुंबई 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर येवून कोणत्याही प्रकारची माहिती आणि पुरावे सादर करण्याची इच्छा नसल्याचे प्रतिज्ञापत्र चांदिवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे.

त्याचबरोबर याप्रकरणात आपल्याला कोणाचीही उलट तपासणी किंवा क्रॉस एक्झामिन करायचे नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या पुराव्याकडे आयोगाला घेवून जायचे नसल्याचेही परमबीर सिंग यांनी सांगितले. याप्रकरणी चांदिवाल आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंग म्हणाले की, त्या प्रकरणासंबधी जी काही माहिती उघड करायची होती किंवा द्यायची होती. ती माहिती मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेली आहे. तसेच या दोघांनीही आपल्याला म्हणण्याची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर २०-३-२०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातही यासंदर्भात सविस्तर माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या