शिक्षकांच्या प्रस्ताव मंजूरीस प्रयत्न करू : आ.रोहित पवार


कर्जत प्रतिनिधी 

कोरोना कालावधीत ड्युटीवर असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या मंत्रालयातील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.

 कर्जत येथे काल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्यावतीने आमदार रोहितदादा पवार यांना विविध प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी आमदार पवार यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी माहिती दिली. मागील दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षक ड्युटीवर असताना मृत्युमुखी पडले असून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी पन्नास लाख रुपयांची मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ होऊन सदरचा लाभ लाभार्थीपर्यंत लवकरात लवकर मिळण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली. 

 प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांसाठी व इतर पुरवणी देयकांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी ही मागणी करण्यात आली. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने 100% शिक्षकांमधून भरण्यात यावीत अशी ही मागणी करण्यात आली. 

पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी तसेच 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या त्रुटी दूर करणे विषयी चर्चा करण्यात आली. एम एस सी आय टी उत्तीर्ण होण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. डी सी पी एस बांधवांच्या कपात झालेल्या रकमांचा हिशोब तातडीने मिळवून एनपीएस कार्यवाहीबाबत एकवाक्यता आणावी याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

 यावेळी आमदार रोहित पवार यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असून मंत्रालयातील सर्व कामे प्राधान्याने करून घेणे विषयी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे विषयी आश्वासन दिले.

 या शिष्टमंडळात बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, शरदभाऊ सुद्रिक, विकास मंडळ विश्वस्त पांडुरंग खराडे, बाळासाहेब तापकीर, अनिल टकले, आबासाहेब सुर्यवंशी, कर्जत तालुका संघाचे अध्यक्ष दत्तात्रय राऊत, पारनेर तालुका संघाचे अध्यक्ष सुर्यकांत काळे, दक्षिण प्रमुख किशोर माकुडे, अनिल नरसाळे, अविनाश बचाटे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ दिवटे, राम शेटे, सुनील बेलकर, संतोष डहाळे, रामचंद्र राजापुरे,  बाळासाहेब बोरकर, उद्धव घालमे, संदिप ठाणगे, नारायण पिसे, विठ्ठल सुद्रीक, बजरंग गोडसे, ईश्वर सोलनकर, ज्ञानदेव सुद्रीक, अमोल गांगर्डे, योगेश खेडकर, राजेंद्र सकट, कुंडलिक सूर्यवंशी, कैलास गांगर्डे, सचिन गांगर्डे व इतर संघ व गुरु माऊली प्रेमी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या