अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशाला मिठाई दुकानदाराकडून केराची टोपली


बारामती 

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (दि:३०) रोजी बारामतीत अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले. या दरम्यान  शहरातील भिगवण रस्त्यावरील हिंद स्वीटस या मिठाईच्या दुकानामध्ये तब्बल ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आल्याने सदर दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने

कारवाई करत मिठाईचे दुकान १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र या आदेशाला दुकानदाराने केराची टोपली दाखवली आहे. 

अद्याप सदर हे मिठाईचे दुकान चालूच आहे. यावरून भेसळखोरांवर बारामती प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. यामध्ये दुकान चालू ठेवण्यासाठी  राजकीय नेत्यांचा हात असू शकतो. अशी शंका वर्तवली जात आहे. हे लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. यांना धंदा महत्त्वाचा आहे, यात लोकांचा जीव गेला तरी चालेल, या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवाशी हे खेळत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

 तरी पण प्रशासन शांत का बसले आहे..? लवकरात लवकर ज्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने रद्द करा आणि त्यांना टाळेबंद करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक ते दोन दिवसांमध्ये मनसे स्टाईलने या दुकानाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती शहर व तालुका संघटक निलेश कदम  यांनी निवडनाद्वारे दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या