दिवाळीत टपाल विभागाला ५८ लाखांचा महसूल


पुणे प्रतिनिधी

टपाल खात्याच्या जनरल पोस्ट ऑफिसला (जीपीओ) दिवाळी पार्सलच्या माध्यमातून तब्बल ५८ लाख २५ हजार रुपयांचा महसूल महिनाभरात मिळाला आहे. दरवर्षी दिवाळीला नागरिक त्यांच्या परदेशातील मुलांना तसेच नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पार्सलद्वारे दिवाळी फराळ, भेटवस्तू पाठवितात. यंदा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जपान, जर्मनी, कॅनडा येथे अनेकांनी पार्सल पाठविल्याची नोंद जीपीओने केली आहे. सर्वाधिक फराळ अमेरिकेला रवाना करण्यात आला.

एक ऑक्टोबरपासूनच जीपीओमध्ये दिवाळीसाठी पार्सल्स पाठविण्यास सुरुवात झाली होती. महिन्याभरात तेराशे पार्सल्स परदेशात पाठविण्यात आली. त्यामध्ये दिवाळी फराळ, ड्रायफ्रुट्स, कपडे,

भेटवस्तू आदींचा समावेश होता, यंदा महिन्याभर अगोदरच जीपीओं येथे पार्सल पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली होती, अजूनही अनेक नागरिक परदेशात दिवाळी पार्सल पाठवित आहेत त्यासाठी रांगाही लागलेल्या दिसतात,

जीपीओचे वरिष्ठ पोस्टमास्तर बी. पी. एरंडे म्हणाले, "जीपीओ हे पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालय आहे. त्यामुळे येथून दरवर्षी अधिक प्रमाणात पार्सल दिवाळीसाठी परदेशात पाठविली जातात. टपाल खात्यातर्फे ८१ देशांना पार्सल पाठविण्याची व्यवस्था आहे.

गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे पार्सल पाठविणाऱ्यांचे प्रमाण मर्यादित होते. त्या तुलनेत यंदा नागरिकांमध्ये उत्साह दिसत होता. महिन्याभरात जीपीओला पार्सलव्दारे उत्पन्नही चांगले मिळाले."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या