निरगुडसर प्रतिनिधी
मंचर गावच्या हद्दीत असलेल्या पुणे नाशिक रोड मयूर हॉटेल च्या समोर पिकअप गाडीने धडक दिल्याने रस्त्यावरून पायी जात असणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीचा अपघात होऊन ते मयत झाले आहेत. याप्रकरणी अमोल बाबुराव हावळे ( रा.मंचर ता.आंबेगाव पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पिकअप चालक अमोल नारायण गवारी ( रा. मेंगडेवाडी गवारीमळा ता.आंबेगाव पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिताराम द्वारकादास ( वय 42 रा. भगवानिया ता.नेपानगर जि. खांडवा ) हे पुणे गोवर्धन डेरी च्या बाजूने पुणे नाशिक हायवे ओलांडून पलिकडे पायी जात असताना त्यांना महिंद्रा कंपनीचे पिकप गाडी एम एच 14 जे एल 2410 या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात द्वारकादास हे गंभीर रित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. याबाबत सीताराम द्वारकादास यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पिकअप चालक अमोल गवारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहे.
0 टिप्पण्या