एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


मांडवगण फराटा

येथील एटीएम मशीन ०७ अॉक्टोंबर २०२१ रोजी तसेच खडकी (ता. दौंड जि. पुणे) येथील एटीएम मशीन दिनांक १० आॕक्टोंबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ गाडीच्या सहाय्याने ओढून चोरून नेल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन व दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

एटीएम मशीन चोरीच्या सलग घडलेल्या दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाकडून चालु होता. सदर पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहा. फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीण, अजित भुजबळ, पोलिस नाईक मंगेश थिगळे,योगेश नागरगोजे, चालक सहा फौजदार मुकुंद कदम यांना नेमण्यात आले होते. तपास पथकाने स्कॉर्पिओ गाडीचा मागोवा घेत रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासल्यानंतर दोन्ही घटनेतील स्कॉर्पिओ गाडी ही आष्टी बाजुकडे गेल्याचे आढळुन आले. 

त्यामुळे  अहमदनगर ते बीड जाणारे सर्व रस्त्यांवरील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करत शिरूर कासार तालुका केंद्रीत केला. तपासा दरम्यान बातमीदारा मार्फत बातमी मिळालेल्या माहीतीवरून शिरूर कासार परीसरातील सराईत गुन्हेगार मल्हारी भिमराव केदार, बाळासाहेब एकनाथ केदार हे पांढरे रंगाची स्कॉर्पिओ वापरत असून त्यांनी त्यांचे साथीदाराचे मदतीने ए.टी.एम मशीन चोरीचा गुन्हा केला आहे.  तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर खात्री करत दोन तपास पथकाच्या मदतीने आरोपी  मल्हारी भिमराव केदार, वय २९ वषे, रा. शिरूर कासार ता. शिरूर कासार जि. बीड,बाळासाहेब एकनाथ केदार, वय २९ वर्षे, रा. शिरूर कासार ता. शिरूर कासार जि.बीड, संभाजी त्रिंबक मिसाळ, वय ३५ वर्षे, रा. खोकरमोह ता. शिरूर कासार जि. बीड यांना ताब्यात घेतले असून त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सदर  गुन्हयात वापरलेली गाडी ही हडपसर परीसरातून चोरी गेली असल्याचे निष्पन्न झाले. मल्हारी केदार व बाळासाहेब केदार यांनी त्यांच्या हडपसर येथील साथीदाराचे मदतीने स्कॉर्पिओ गाडी मिळवली असल्याचे निष्पन्न झाले. 

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा. पोलीस निरीक्षक संदिप येळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहा फौज तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके,राजु मोमीण, अजित भुजबळ,चंद्रकांत जाधव,सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, पोलिस नाईक मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे,पोलिस कॉस्टेंबल. धिरज जाधव, चालक सहा फौज मुकुंद कदम यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या