वानखेडेंसह चौघांची एनसीबीतून हकालपट्टी करा

आर्यन खान कटामागे भाजपचे मोहीत कंबोज : मलिक  


मुंबई 

शहरात ड्रग्जचे स्वत:चे रॅकेट चालविले जावे या उद्देशाने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, व्ही.व्ही.सिंग, रंजन आणि एक ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी काम करत असून एनसीबीची प्रतिमा सुधारण्यासाठी या चार जणांना हटविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केली.

बोलायचे बंद केले नाहीतर तुझा मुलगा खूप दिवस जेलमध्ये राहील, तुझ्यावरही खोट्या केसेस करू, आशा धमक्या अभिनेता शाहरूख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना देण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी केल्या.   

या संपूर्ण प्रकरणामागे भाजपा नेते मोहित कंबोज हेच सुत्रधार असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज  त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.  दिवाळीनंतर आपणच बॉम्ब फोडणार असल्याचे त्यांनी  जाहिर केले होते. त्यानुसार त्यांनी मोहित कंबोज, समीर वानखेडे यांच्यासह चार जणांची नावे जाहीर केली.

हे संपूर्ण प्रकरण किडनॅप आणि खंडणीचे असून आर्यन खानला किडनॅप करून शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याचे हे प्रकरण आहे. या संपूर्ण कटाचा सुत्रधार मोहित कंबोजच असल्याचा आरोप करत त्याच्या घरावर दिड वर्षापूर्वी रेड झाली होती. त्यानंतर तो भाजपात गेला आणि त्यानंतर त्याचे प्रकरण दाबले गेले, असे मलिक म्हणाले.

सॅम डिसुझा यांचे खरे नाव सॅनियल स्टॅनली डिसुझा असे असून मागील एका प्रकरणात जे पाच आरोपी होते. त्यातील हा पाचव्या क्रमांकाचा आरोपी आहे. त्याला काही दिवसांपूर्वी एनसीबीने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु त्यास अद्याप का अटक करण्यात आली नाही असा सवाल करत ही नोटीस मिळाल्यानंतर डिसुझा आणि एनसीबी अधिकारी व्हि.व्ही.सिंग यांच्यात फोनवरून बोलणे झाल्याची ऑडिओ क्लिपही त्यांनी यावेळी ऐकविली.

तसेच याप्रकरणात हवाल्याच्या माध्यमातून ५० लाख रूपयांची देवाण-घेवाण केल्याची कबुलीही सॅम याने दिली. मात्र के.पी.गोसावीच्या एका सेल्फीमुळे १८ कोटी ठरलेली डिल कॅन्सल झाल्याचे पगारे यांनी सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुनिल पाटील आणि सॅनियल डिसूझा यांच्या जे बोलणे झाले. त्याची माहिती भाजपा नेते मोहित कंबोज यानेच उघड केली हे एक बरे झाले असून मच्छली खुदही अपने जाल मे फस गई असे सांगत मोहित कंबोज यांचा मेव्हणा रिषभ सचदेवा आणि फर्निचरवाला या दोघांनीच आर्यन खान याला क्रुज शिपवर जाणीवपूर्वक आणले असा आरोप करत या कटाचा खरा सुत्रधार हा मोहित कंबोजच गौप्यस्फोट करत आर्यन खान स्वत:हून तिकिट काढून क्रुजवर गेला नाही असेही त्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या