पीएमआरडीए निवडणूक : शिरूरमधून डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे तर भाजपकडून मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे विजयी

 


पुणे : पीएमआरडीए निवडणूकीत शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे तर हवेलीतून भाजपकडून मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे यांनी बाजी मारली. विजयानंतर उपस्थित शिरूर-हवेलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

……..

वाघोली : पीएमआरडीए सदस्य निवडणूकीत शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर हवेलीतून भाजपकडून मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे यांनीही बाजी मारली आहे. 

      डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत गव्हाणे व मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील उंद्रे या दोन युवकांनी मिळवलेल्या यशाचे शिरूर - हवेलीत कौतुक होत आहे.



दोघांचेही गावात ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

     निवडीनंतर बोलताना यशवंत गव्हाणे म्हणाले, 

'डिंग्रजवाडी सारख्या छोट्या गावचा सरपंच असलो तरीही ‘पीएमआरडीए’ सारख्या विकासाचा आराखडा बनविणाऱ्या संस्थेत शिरुरचा प्रतिनिधी असावा, याच उद्देशाने अपक्ष म्हणून निवडणुक लढवली. माझ्या प्रामाणिक उद्देशाला तसेच माझे वडील ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे यांच्या गेल्या ४० वर्षांच्या निरपेक्ष राजकीय, सामाजिक सेवेला कोरेगाव भीमासह तालुक्यातील गावांनी पाठबळ दिले. यापुढेही पीएमआरडीएचा लाभ शिरूर तालुक्याच्या विकासाला करुन देण्याचा उद्देश असल्याचेही नवनिर्वाचित सदस्य यशवंत गव्हाणे यांनी सांगितले.

     तर मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील उंद्रे म्हणाले, 'महापालिकेलगत असलेल्या हवेली तालुक्यात वेगाने नागरीकरण वाढत असून येथील विकासही अधिक चांगल्या रितीने होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने मी मांजरी खुर्द सारख्या छोट्या गावचा सरपंच म्हणून भाजपच्या वतीने निवडणुक लढविली. भाजपचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला अनेक गावच्या प्रतिनिधीनीही चांगले पाठबळ दिल्याने माझ्या यशाचा मार्ग सुकर झाला.

हवेलीच्या नियोजनबद्ध विकासाला सर्वाधिक प्राधान्य देणार आहे.

……..

पुणे : पीएमआरडीए निवडणूकीत शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे तर हवेलीतून भाजपकडून मांजरी खुर्दचे सरपंच स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे यांनी बाजी मारली. विजयानंतर उपस्थित शिरूर-हवेलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या