कार्तिकीच्या स्वरांनी रंगली दिवाळी पहाट


आळंदी 

श्री श्रेत्र आळंदी आणि श्री श्रेत्र देहूच्या मध्ये वसलेली मोशी नगरीत यंदा पहील्यांदाच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड आणि पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या स्वरानुभूती दिवाळी पहाट कार्यक्रमांनी मोशीकरांची दिवाळी पहाट स्वरांनी रंगली गेली. याप्रसंगी अभंग,भारूड,लोकगीते,लावणी तसेच हिंदी मराठी गाण्यांनी मोशीतील नागरीक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी वस्ताद किसनराव लांडगे,नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सारिका बोर्हाडे, अश्विनी जाधव, मंगल आल्हाट, संतोष जाधव, सागर हिंगणे, राजूशेठ सस्ते आदि मान्यवर उपस्थित होते. मोशीतील या पहील्या दिवाळी पहाटेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट आणि हिरामण आल्हाट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा थिगळे हीने केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या