कृणाल पंड्यावर मोठ्या स्पर्धेआधी संघनेतृत्व सोडण्याची वेळमुंबई : खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या कृणाल पंड्याला बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार व्हावं लागलं आहे. या अष्टपैलू खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय घेत बडोदा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कृणालने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

क्रुणालने बोर्डाचे अध्यक्ष प्रणव अमीन यांना हा मेल पाठवला असून त्यात लिहिले आहे की, “मला तुम्हाला कळवायचे आहे की, “मी सुरु होणाऱ्या देशांतर्गत हंगामात बडोद्याच्या कर्णधारपदासाठी उपलब्ध असणार नाही. मात्र, संघात निवडीसाठी मी उपलब्ध असेन. संघाचा सदस्य म्हणून मी माझं बेस्ट देईन. संघहितासाठी मी पूर्ण योगदान देईन.”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या