टाकळीभान
बँकेचे कामकाज करताना ग्राहकांचे हित जोपासून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणार असून ग्राहकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ग्राहकांचे समाधान केले जाईल असे प्रतिपादन टाकळीभान बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा अधिकारी तनपुरे यांनी ग्राहक परिसंवाद मेळाव्यामध्ये केले.
टाकळीभान बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने ग्राहक परिसंवाद मेळाव्याचे आयोजन व पोलीस अधिकारी यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली त्याबद्दल सद्भावना सामाजिक दायित्व व्यक्त करून श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना बँकेच्या वतीने सन्मान चिन्ह प्रधान करण्यात आले ते त्यांचे प्रतिनिधी टाकळीभान चे भूमिपुत्र पोलीस हे.कॉ. प्रशांत रणनवरे यांनी स्वीकारले.
यावेळी बोलताना शाखाधिकारी तनपुरे म्हणाले की आम्ही बँकेचा कार्यभार घेतल्यानंतर 64 कर्जमाफीची पेंडिंग खाती क्लिअर केली. त्याचप्रमाणे बँकेचे कामकाज करताना ग्राहकांच्या समाधानास व हितासाठी प्राधान्य देणार असून ग्राहकांनी बँकेच्या नियमांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध कर्ज सुविधा यामध्ये पीक कर्ज, वाहन कर्ज ,नवीन घरबांधणी, घर दुरुस्ती, नवीन वाहनावर तीन वर्षानंतर वाहन कर्ज, अल्प व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना सातबारावर सोने तारण कर्ज, विमा पॉलिसीवर कर्ज, आदि स्वरुपाच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे बँक कर्ज वसुली सहकार्य करावे. गेल्या दोन-तीन वर्षापासून कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत होत आहे.शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट न पाहता नियमितपणे कर्जाची परतफेड करावी व आपली बँकेत पत वाढवावी असे ते म्हणाले. तसेच जामीनदार याबरोबर आपलीही कर्ज परतफेडीची जबाबदारी असून आपण जरी व्यवहारांमध्ये क्लिअर असू परंतु जमीनदाराच्या कर्ज थकीत त्यामुळे आपले सिबिल खराब होऊन आपल्याला नवीन कर्जास अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपण जामीनदारला वेळी वेळी सावध करून कर्ज परतफेड करून घ्यावी.
या ग्राहक मेळावा परिसंवाद कार्यक्रम प्रसंगी माजी उपसरपंच पाराजी पटारे, दादासाहेब पटारे, घोगरगावचे मधुकर पटारे, व्यापारी असोसिएशनचे पवन काठेड ,जितेंद्र मिरीकर ,नंदकुमार जाधव, प्रसाद कोकणे, रवींद्र भालसिंग, सुनील बोडखे, किरण मेहेत्रे, प्रवीण बनकर, मनोज परदेशी,प्रदीप टूपके ,विशाल नहार, प्रदीप नवघणे ,विशाल शिवरकर, ज्ञानेश्वर कोकणे,बंडू राक्षे, रवींद्र मेहेत्रे, समीर शेख, मिनी बँक सेतू चालक गणेश पवार ,आकाश चौरे ,सुजित मोटकर, सुनील खेमनर, बँक कर्मचारी शैलेश भरे, आबासाहेब घोडेचोर, शरद गुंड ,आदिनाथ काटे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या