ऑल इंडिया जनरल ईन्शुरन्स एस सी, एस टी युनियनने घेतली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट
मुंबई-: -समीर वानखेडे बोगस प्रमाणपत्र प्रकरणी भूमिका घेतल्याबद्दल तसेच देश आणि राज्यातील बोगस अधिकारी कर्मचारी यांच्यासंदर्भात ऑल इंडिया जनरल ईंशुरन्स एस सी एस टी एम्लाॅईज वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली.
ईन्शुरंस कंपनीमध्ये देखील बोगस प्रमाणपत्रे सादर करून मागासवर्गीयांच्या जागा बळकावण्याची अनेक प्रकरणे असून यासंदर्भात संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पवार यांनी या बैठकीत सांगितले. सदर युनियनचे देशभरात 17 हजार सदस्य असून ईन्शुरन्स कंपनीतील प्रबळ संघटना म्हणून सदर युनियनला मान्यता आहे.
ऑल इंडिया महासचिव अनिल सोनावणे, पश्चिम विभाग महासचिव सोपान पवार, मुंबई सहसचिव अविनाश वाघमारे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
---–---------–
तरुणांसाठी सुवर्णसंधी...
'सह्याद्री युथ फोरम' जॉईन करा आणि विकासाच्या वेगवान प्रक्रियेत सहभागी व्हा, भरघोस उत्पन्न मिळविण्याची संधी...
आजच या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा आणि संधीचा लाभ घ्या...👉 सह्याद्री युथ फोरम
---------
ऑल इंडिया जनरल ईन्शुरन्स एस सी एस टी एम्लाॅईज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पवार
0 टिप्पण्या