शेतकऱ्यांसाठी खुशखबर !

 


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यालाही मोठा आधार मिळणार आहे. कृषी सेवा केंद्रांनी कृत्रिम टंचाई भासवून लूट सुरु केली होती त्याला आता आळा बसणार आहे.

सध्या देशात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली असून, खताची कमतरता असल्याची तक्रार विविध राज्यांतील शेतकरी करत आहेत. खते मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हिंदू बिझनेस लाइनला सांगितले की, पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात 10 लाख टन आयात केलेले खत येईल तर 6 लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या