सातारा जिल्ह्यातील मेढा येथील संतोष शिंदे या एसटी कर्मचाऱ्याचा ताणतणावामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आणि चिंता करणारी आहे, असे सांगतानाच या मृत्यू प्रकरणी परिवहन मंत्र्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता व नाकर्तेपणा अशा घटनांमधून दिसू लागला आहे. दबावतंत्राचा वापर करुन कर्मचा-यांना कामावर बोलावण्याच्या या पध्दतीमुळे कर्मचारी तणावाखाली येत आहेत. त्यातूनच ही दुदैर्वी घटना घडली असावी. सरकार किती निष्पाप एसटी कर्मचा-यांचे बळी घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने आता तरी जागे व्हावे व या गंभीर घटनेची दखल घेऊन घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने सकारात्मक रित्या पूर्ण कराव्यात, असेही दरेकर म्हणाले.
0 Comments