Breaking News

बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष

गुरुनानक जयंतीनिमित्त शहरातून प्रभात फेरी


नगर प्रतिनिधी

बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरातील विविध गुरुद्वारा येथे गुरुनानक देवजी यांची 552 वी जयंती म्हणजेच गुरुपुरब उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि.19 नोव्हेंबर) सकाळी तारकपूर येथील भाईकुंदनलालजी गुरुद्वारा, अहमदनगर शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने पारंपारिक वाद्यासह प्रभातफेरी काढण्यात आली होती. यामध्ये समाजबांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुनानक देवजी यांचा जयघोष केला.  

या प्रभातफेरीचे टॉपअप पेट्रोल पंम्प येथे जनक आहुजा परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. फेरीमध्ये वाहनावर असलेल्या गुरुग्रंथ साहिबावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

 गुरुनानक जयंती निमित्त मागील सात दिवसापासून शहरातील गुरुद्बार्‍यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन-प्रवचन, अखंडपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गुरूनानक देवजी यांचे संदेश व विचार समाज बांधवांना सांगण्यात आले.


No comments