आळंदी
कवींना हक्काचे आणि सन्मानाचे व्यासपीठ मिळून देण्यासाठी नक्षत्राच देण काव्यमंच गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे.
या २२ वर्षामध्ये काव्यं मंचाने अनेक उपक्रम,काव्यामैफिली तसेच काव्य सहलींचे आयोजन केले.ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी मैलारीराज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याला ७२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २२ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल २०२१ आणि २२ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण तसेच विविध पुरस्कार वितरण सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे पार पडले गेले.
या संमेलनाचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोहिनूर ग्रुपेचे चेअरमन कृष्णकुमार गोयल,नक्षत्राच देण काव्यमंचाचे अध्यक्ष प्रा.राजेश सोनावणे,पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ.कैलास कदम,माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर,शांताराम कारंडे,गणेश कवडे,सुखदेव सोनवणे,हभप पुरुषोत्तम महाराज हिंगनकर,शिवाजी गवारी आदी उपस्थित होते.
या काव्य संमेलनात महाराष्ट्रातुनच नाही तर परराज्यातुन अनेक कवी,कवयित्रीनी काव्य वाचन केले.
अंतिम सत्रात राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण तसेच विविध पुरस्कार वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.यामध्ये प्राचार्य दिपक मुंगसे, राजकवी डाॅ.ख.र.माळवे,डाॅ.मो.शकील जाफरी यांना समाजभुषन पुरस्कार २०२१ देऊन गौरवण्यात आले, श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त तुषार सहाने यांना गौरव स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, समाजसेवक सावळेराम डबडे कविरत्न पुरस्कार जुन्नरचे कवी पियुष काळे,कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री प्रा.सुरेखा कटारिया,नक्षत्र काव्य दौलत पुरस्कार नाशिकचे कवी राजेंद्र उगले,नक्षत्र राजज्योतिष रत्न पुरस्कार नारायणगावचे अनंत घोष यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना नक्षत्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.दरवर्षी प्रमाणे श्रावणी काव्यामैफिलीचे आयोजन करण्यात आले.कविता लेखन,काव्य वाचन स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
0 टिप्पण्या