न्याय मिळण्यासाठी जिवाची बाजी..

पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती   चिंताजनक....!


बोधेगाव प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे या अल्पवयीन मुलाने पोलीसांच्या जाचाला कंटाळुन दि. ०७ सप्टेंबर २०२१ रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मयत आदित्यच्या आईने तसेच नातेवाईकांनी केला होता. दरम्यान या घटनेला दोन महिन्याच्या वर कालावधी लोटून देखील सदरील प्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न केल्याने मयत आदित्यच्या आईने मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर कारवाई होऊन न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. १५ रोजी बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रासमोर आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण चालु केले आहे. दरम्यान आमरण उपोषणाचा पाचवा दिवस उगवल्यानंतर देखील प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली असून अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितल्यानंतर प्रशासनाच्या वतीने औषध उपचार देण्यासाठी रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या परंतु त्यांनी जिव गेला तरी चालेल पन मी न्यायासाठी याच ठिकाणी उपोषण करणार असल्याचे सांगितले.

उपोषणकर्ते संगिता भोंगळे यांची आरोग्य विभागाकडून होत असलेल्या तपासणी अंती आज त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा अहवाल देण्यात आला. पाच दिवसाच्या कालावधीत अनेक संघटनांनी त्याना पाठिंबा दिला आहे. आज उपोषणाला माजी सरपंच रामजी अंधारे, माजी सभापती भाऊराव भोंगळे, वंचितचे नेते कमुभाई शेख, वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, लहुजी सेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन ससाणे, सुखदेव ससाणे, संजय ससाणे, ग्रामपंचायत सद्स्य फिरोज पठाण, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भोगले, राजू इंगावले, कुंडलिक घोरतळे, भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सोपान कदम,  दिगंम्बर टोके, सुगंध खंडागळे, शाखा अध्यक्ष विष्णू वीर, शाहूराव खंडागळे, बाळासाहेब भोंगळे, गौतम भोंगळे, बाबा गिरी यांच्यासह आदी ग्रामस्थ तसेच समाज बांधव मोठ्या यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.


बोधेगाव येथील पोलीस दुरक्षेत्रासमोरील उपोषण कर्त्या संगीता भोंगळे या रुग्णाचा रक्तदाब ( बी. पी. ) कमी होत चालला असून, शरीरामधील पाण्याची पातळी ही कमी होत चालली आहे. त्यामुळे रुग्णाला औषधोपचार तसेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची अत्यंत आवश्यकता असून, रुग्णांचे वजन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तसेच सदरील रुग्णाला अन्न व पाण्याची तसेच हॉस्पिटलमध्ये भरती होऊन औषधोपचाराची अत्यंत गरज असून तसे न झाल्यास रुग्णाच्या जीवितास कुठल्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो. सध्या रुग्णाची प्रतिकृती फार चिंताजनक आहे.

- डॉ. रविना सांगळे- वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय बोधेगव


मी कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही तसेच जोपर्यंत माझा मुलगा मयत आदित्य भोंगळे याला ज्या पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे आणि ज्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे. त्यांचे निलंबन होऊन त्यांच्या विरोधात कारवाई होइपर्यंत उपोषण सोडणार नाही. भले माझा जीव गेला तरी हरकत नाही.

- संगीता भोंगळे, मयत आदित्य भोंगळे यांची आई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या